AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Nov 16, 2026 | 10:43 AM
Share

संजय राऊत यांनी मुंबईतील एसआरए प्रकल्पांमध्ये ३०,००० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांचा हवाला देत, नियमांचे उल्लंघन करून बिल्डरांना फायदा पोहोचवला जात असल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांनी या प्रकरणाच्या तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुंबईतील एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बिल्डरांनी नियमबाह्य पद्धतीने 300 हून अधिक प्रकल्प मंजूर करून घेतले आहेत, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीचे सुमारे 30,oo0 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसआरए नियमांच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले होते. यापूर्वी माजी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही अशाच आशयाचे पत्र गृहनिर्माण सचिवांना लिहिले होते. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत, अश्विनी भिडे यांच्या पत्राची दखल न घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी बेकायदेशीरपणे मंजूर झालेल्या प्रकल्पांची चौकशी करून दोषी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published on: Nov 16, 2026 10:43 AM

Follow Us