AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापौरपदाचा पदभार स्वीकारताच पहिली कारवाई कोणावर? रितू तावडेंनी ॲक्शन प्लॅनच सांगितला

मुंबईच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच आपली प्राथमिकता जाहीर केली आहे. मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याला माझे पहिले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महापौरपदाचा पदभार स्वीकारताच पहिली कारवाई कोणावर? रितू तावडेंनी ॲक्शन प्लॅनच सांगितला
Ritu Tawde bmc
| Updated on: Feb 11, 2026 | 11:11 AM
Share

मुंबई महानगरपालिकेत आज ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची औपचारिक घोषणा केली जाणरा आहे. तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भाजपचा दुसरा महापौर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होत आहे. भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शिवसेना शिंदे गट गटाचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेवरील प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात येणार आहे.

देवाभाऊंचे आभार

मुंबईच्या महापौरमधून निवड निश्चित झाल्यानंतर रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत. याबद्दल त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले काम काय करणार याचीही सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहि‍णींचे लाडके भाऊ देवा भाऊ यांनी बहि‍णींसाठी दिलेला शब्द पाळला आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी आज लाडक्या बहि‍णींना हा बहुमान दिला आहे. त्यामुळे देवाभाऊंचे आभार मानावे तेवढे कमी आहे. मुंबईच्या अध्यक्षा अमित साटम त्यांनीही माझे नाव सुचवले होते. त्यामुळे भाजपची पंरपरा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं. घराणेशाहीला नाही, हे या निवडीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे रितू तावडे म्हणाल्या.

मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते की जरी मी महापौर झाली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याला माझे प्राधान्य असेल, अशीही माहिती रितू तावडे यांना दिली.

संजय राऊतांच्या सूचना नक्की स्वीकारणार

संजय राऊतांकडे टीका करण्यापलीकडे काहीही राहिलेले नाही. सकाळी ९ चा भोंगा असो नाहीतर इतर कुठलाही भोंग्याची दखल आम्ही घेत नाही. जनतेने आम्हाला फार अपेक्षेने निवडून पाठवलं आहे. मुंबईचं काम करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलं आहे. संजय राऊतांनी जर काही चांगल्या सूचना मुंबईसाठी दिल्या तर त्या नक्की स्वीकारणार. रस्ते, खड्डे, पाणी ज्या काही इतर मुलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी