अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या काश्मिरमध्ये सध्या कार्गिल मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा होता. मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला. त्यांच्या जागी श्रीकांत शिंदे यांनी कार्गिल मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना महत्त्वाचे वक्तव्य केले. कार्गिलमधील उणे 40 डिग्री तापमानात जवान देशसेवा करत आहेत, हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. “मी आज या ठिकाणी आलो हे माझं भाग्य आहे,” असेही ते म्हणाले.
महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक मोठ्या घटनेनंतर एकनाथ शिंदे हे काश्मीरला पोहोचत असतात. गेल्या वेळी केलेल्या दौऱ्यात त्यांनी शब्द दिला होता तो पाळला. त्यांनी काश्मीरमध्ये CT Scan आणि Ambulance सुविधांसा पुरवल्याचं स्वतः श्रीकांत शिंदेंनी सांगितल. शिवसेना आणि काश्मीर यांचे नाते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून असल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना आरक्षण मिळावे यासाठीही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न केले होते.
Published on: Jul 05, 2026 11:11 AM
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;