AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : कॅप्टन सूर्याकडून संजूला मोठा झटका, ओपनरला खराब कामगिरीचा फटका, काय झालं?

Sanju Samson India vs South Africa Warm Up Match T20i World Cup 2026 : संजू सॅमसन याने गेल्या काही आठवड्यात टी 20i वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या मालिकेत बॅटिंगने निराशा केली. संजूला त्या कामिगरीचा पहिला मोठा झटका बसला आहे.

IND vs SA : कॅप्टन सूर्याकडून संजूला मोठा झटका, ओपनरला खराब कामगिरीचा फटका, काय झालं?
Sanju Samson Indian Cricket TeamImage Credit source: TV9 Bharatvarsh
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 04, 2026 | 7:22 PM
Share

आयसीसी टी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. टीम इंडिया या स्पर्धेआधी एकमेव सराव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे आज 4 फेब्रुवारीला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फटकेबाजीचा आनंद घेता येणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात मोठा बदल केलाय. सूर्याने यासह मुख्य स्पर्धेत मोठ्या बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सूर्याने या सराव सामन्यात अभिषेक शर्मा याच्यासह इशान किशन सलामीला येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजूचा ओपनर म्हणून पत्ता कट करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता संजूला मधल्या फळीत फलंदाजीसाठी यावं लागणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांतही आता अभिषेक आणि इशान हीच जोडी ओपनिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

तिलकचं कमबॅक, संजूची जागा धोक्यात!

तसेच टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा याचंही दुखापत आणि शस्त्रक्रियेनंतर संघात कमबॅक झालं आहे. तिलकने यूएसए विरूद्धच्या सामन्यातून इंडिया ए साठी कमबॅक केलं होतं. त्यानंतर आता तिलक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही खेळणार आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कप स्पर्धेतही तिलक खेळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

संजूला खराब कामगिरीचा फटका

संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत निराशा केली होती. टीम मॅनेजमेंटने संजूला न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात संधी दिली होती. मात्र संजू या पाचही सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता. संजूला फक्त 40 धावाच करता आल्या. तर दुसऱ्या बाजूला इशान किशन याने धमाका केलेला.

इशानने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात शतक केलं होतं. त्यानंतर संजू सॅमसन याच्याकडे असलेली विकेटकीपिंगची जबाबदारी अचानकपणे इशानला देण्यात आली. तेव्हापासूनच संजूबाबत वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत होती. त्यानुसार आता संजूला ओपनिंग करण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे. आता संजूला यूएसए विरुद्ध टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्यात संधी मिळणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...