AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : संजूला झटका, सामन्यादरम्यान हिसकावली मोठी जबाबदारी, वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळण्याचे संकेत!

Sanju Samson India vs New Zealand 5th T20I : संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतर संजूला अंतिम सामन्यात मोठा झटका लागला आहे.

IND vs NZ : संजूला झटका, सामन्यादरम्यान हिसकावली मोठी जबाबदारी, वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळण्याचे संकेत!
Sanju Samson Team IndiaImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 01, 2026 | 2:50 AM
Share

भारताने न्यूझीलंडवर पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात मात करत मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सातत्याने टी 20i मालिका जिंकण्याची परंपरा कायम राखली. आता टीम इंडिया थेट टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. भारतात 7 फेब्रुवारीपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला मोठा झटका लागला आहे. संजूकडून पाचव्या सामन्यादरम्यान मोठी जबाबदारी काढून घेण्यात आली.

संजूऐवजी सामन्या दरम्यान इशान किशन विकेटकीपरच्या भूमिकेत दिसला. या अशा प्रकारामुळे संजूला वर्ल्ड कप स्पर्धेतील प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू मिळण्याचे संकेत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे. नक्की या सामन्यात काय झालं? हे जाणून घेऊयात.

संजू सॅमसन या मालिकेतील पहिल्या 4 टी 20i सामन्यात अपयशी ठरला. संजूला फक्त 40 धावाच करता आल्या. मात्र त्यानंतरही संजूला त्याच्या घरच्या मैदानात अर्थात तिरुवनंतरपुरममधील ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये संधी देण्यात आली. संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात आलं. मात्र संजूने इथेही निराशा केली. तर दुसऱ्या बाजूला इशान किशन याने कमाल केली. इशानने शतक झळकावलं. इशानने 103 धावांची विस्फोटक खेळी केली. इशानने केलेल्या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं.

न्यूझीलंडची सलामी जोडी विजयी धावंचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. तर संजूऐवजी इशान किशन याच्या हातात ग्लोव्हज दिसले. यातून संजूऐवजी इशान विकेटकीपिंग करणार असल्याचं स्पष्ट झालं. वर्ल्ड कप स्पर्धेआधीच्या शेवटच्या सामन्यात टीम मॅनेजमेंटच्या अशा निर्णयामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. इशानला वर्ल्ड कप स्पर्धेत विकेटकीपिंगची जबाबदारी देऊन संजूला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर ठेवण्याची रणनिती आखली जात नाही ना? असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

इशानकडून संधीचं सोन, संजू फ्लॉप

दरम्यान इशानला वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत संधी मिळाली. इशानने या संधीचा फायदा घेतला. इशानने अंतिम सामन्यात शतक झळकावलं. तर संजूने या मालिकेतील 5 सामन्यात संधी मिळूनही केवळ 46 धावा केल्या. इशानला टी 20i वर्ल्ड कपसाठी बॅकअप विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली. तर संजू सॅमसन प्रमुख विकेटकीपर आहे. मात्र संजूची सध्याची कामगिरी आणि तिरुवनंतरपुरममध्ये विकेटकीपिंगबाबत झालेला प्रकार पाहता त्याला वर्ल्ड कपसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी