AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी

खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस… रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी

| Updated on: Nov 15, 2026 | 3:51 PM
Share

आमदार रवी राणा यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून खासदार निष्क्रिय असून, जनतेला त्यांचा पत्ताही माहिती नाही, असे राणा म्हणाले. खासदारांचा शोध घेणाऱ्यास बक्षीस देण्याचे फलक मेळघाटात लावण्यात आले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सक्रिय कार्यशैलीशी त्यांनी खासदारांच्या निष्क्रियतेची तुलना केली.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून खासदार अनुपस्थित आणि निष्क्रिय असल्याची टीका राणा यांनी केली. खासदारांचा पत्ता शोधण्यासाठी लोकांनी खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा असे फलक मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये लावले असल्याचे राणा यांनी नमूद केले. राणा यांनी म्हटले की, अमरावती जिल्ह्याला प्रथमच असे पालकमंत्री लाभले आहेत जे गोरगरीब, आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेत जाऊन दिवाळी साजरी करतात.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महिन्यातनं चार ते पाच वेळा जिल्ह्यात येतात, प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष देतात आणि विकासासाठी मदत करतात. बावनकुळे हे विकासाचे महामेरू असून त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, असे कौतुक राणा यांनी केले. याउलट, अमरावतीचे खासदार पूर्णपणे अयशस्वी, असफल आणि निष्क्रिय ठरले असून, त्यांनी एकही विकासकाम केले नाही अशी जनतेची भावना असल्याचे राणा यांनी सांगितले.

Published on: Nov 15, 2026 03:51 PM

Follow Us