AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरात विहीर खोदताना कठडा कोसळून कामगार गाडले गेले,12 तासानंतर एका मजूराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

शेतात विहीर खणण्याचे काम सुरु असताना पंढरपूरातील आंबे गावात विहीराचा कठडा कोसळल्याने मातीच्या ढीगाऱ्या चार कामगार अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मजूरांना शोधण्याची मोहीम सुरु असून त्यात १२ तासांनंतर एका मजूराचा मृतदेह हाती लागला आहे.

पंढरपूरात विहीर खोदताना कठडा कोसळून कामगार गाडले गेले,12 तासानंतर एका मजूराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश
pandharpur well wall collapsed
| Updated on: Nov 15, 2026 | 11:22 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आंबे गावात विहीर खोदताना कठडा कोसळल्याने यात चार कामगार मातीच्या ढीगाऱ्यात गाडले गेल्याची घटना घडली होती. या ठिकाणी गेल्या १२ तासांपासून बचाव कार्य सुरु असून आता अखेर रात्री एका मजूराचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. या खोदकामात मातीच्या ढीगाऱ्या खाली आणखीन तीन जण सापडल्याचे म्हटले जात असून त्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. या ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि प्रशासनाचे कर्मचारी पोकलेन आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने ढीगारा उपसून काढत आहेत.

१२ तासानंतर एका मजूराचा मृतदेह सापडला

पंढरपूरातील आंबे गावात शेतात विहीर खणताना अचानक विहीरीचा कठडा कोसळल्याची घटना सकाळी घडली होती. या दुर्घटनेत चार मजूर आता विहिरीच्या आता गाडले गेल्याची भिती व्यक्त होत होती. त्यानंतर या ठिकाणी सोलापूरच्या जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन हे स्वत: घटनास्थळी हजर राहून बचाव मोहिम सुरु करण्यात आली. या कामगारांना सुखरुप काढण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि आपात्कालिन टीमचे जवान गेल्या १२ तासांपासून अखंड मेहनत घेत होते. मात्र, १२ तासानंतर एका मजूराचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे.

एनडीआरएफ आणि बचाव पथकाच्या टीमला १२ तासांच्या अथक मेहनतीनंतर या ठिकाणी एका दगडाच्या ढीगार्‍याखाली अडकलेला कामगाराला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. वैद्यकीय तपासणी या कामगाराला मृत घोषीत केले आहे. या ठिकाणी आता आणखी तीन मजूर आत अडकले असल्याचे माहिती आहे. त्यांचा शोध देखील सुरु आहे. रात्र झाल्याने येथे विद्युत प्रकाश यंत्रणा, आणि पोकलेन तसेच जेसीबी मशिन लावून या कामगाराचा शोध घेण्याची मोहिम सुरु आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी