AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

heena Gavit: जनजाती शब्द मोदींनी आणलेला नाही, संविधानातच उल्लेख; हिना गावितांचा गोवाल पाडवींवर निशाणा

heena Gavit Questions Goval Padavi Remarks: बिरसा मुंडा जयंतीवरून हिना गावितांनी गोवाल पाडवींवर निशाणा साधला आहे. बिरसा मुंडा जयंतीवरून राजकीय रणकंदन दिसून आले आहे.

heena Gavit: जनजाती शब्द मोदींनी आणलेला नाही, संविधानातच उल्लेख; हिना गावितांचा गोवाल पाडवींवर निशाणा
Hina Gavit Takes a Dig at Goval Padavi
| Updated on: Nov 15, 2026 | 11:38 PM
Share

माजी खासदार हिना गावित यांनी गोवाल पाडवी यांच्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी भारतीय संविधानाचा अभ्यास करावा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच स्वतःला ॲडव्होकेट म्हणवणाऱ्या गोवाल पाडवी यांची वकिलीची पदवी तपासली पाहिजे, असेही गावित यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हिना गावित म्हणाल्या की, जनजाती हा शब्द भाजपने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेला नाही. भारतीय संविधानातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अनुसूचित जनजाती’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या शब्दावरून किंवा त्याच्या वापरावरून आक्षेप घेण्यापूर्वी संविधान समजून घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातात संविधान घेऊन फिरणाऱ्यांनीच आता संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, अशी टीकाही त्यांनी केली.

संविधान केवळ फोटोसेशनसाठी हातात धरण्यापेक्षा ते उघडून वाचले असते, तर अशा प्रकारचे विधान केले नसते, असे म्हणत गावित यांनी पाडवी यांच्यावर निशाणा साधला. संविधानात अनुसूचित जनजातीचा उल्लेख असताना जनजाती हा शब्द भाजप किंवा मोदींनी आणल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करणे हा गुन्हा कसा ठरू शकतो, असा सवालही हिना गावित यांनी उपस्थित केला.

जयंती साजरी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असेल, तर नेमक्या कोणत्या कायद्याच्या आणि कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करणार, हे गोवाल पाडवी यांनी वकील म्हणून स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी दिले. इतकेच नव्हे, तर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला विरोध करणाऱ्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मतही हिना गावित यांनी व्यक्त केले.

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याला विरोध करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले. एकीकडे संविधानातील तरतुदींचा दाखला, तर दुसरीकडे आदिवासी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत हिना गावित यांनी गोवाल पाडवी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे बिरसा मुंडा जयंती आणि ‘जनजाती’ या शब्दावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आला आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी