AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?

NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?

| Updated on: Nov 14, 2026 | 8:11 AM
Share

दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात 35 मिनिटे बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये गट पडल्याच्या चर्चांना या भेटीमुळे बळ मिळाले आहे, तसेच पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याचीही माहिती आहे.

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात 35 मिनिटे बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संसद परिसरात झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. या भेटीनंतर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले की काय? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला आहे.

दिल्लीत सुनील तटकरेही उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे, मुंबईमध्ये सुनेत्रा पवारांनी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक घेतल्याची बातमी आहे. या बैठकीत शरद पवारांकडून फोन येतात का, अशी विचारणा सुनेत्रा पवारांनी आमदारांना केल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा आहे. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवरून पटेल आणि तटकरेंनी याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केल्याचेही समोर आले आहे. सुनील तटकरेंना पक्षामध्ये टार्गेट केले जात असल्याची भावना अदिती तटकरेंनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

Published on: Nov 14, 2026 08:11 AM

Follow Us