Baramati | रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक थेट बारामतीत; लवकरच…
आज बारामती येथे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून बारामती विमानतळाची पाहणी करण्यात आली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 13 दिवस पूर्ण झाले असून या घटनेवरून राज्यातील राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की घातपात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध नेते आणि पक्षांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत जवळपास दीड तासांचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी त्यांनी अपघातामागे 100 टक्के घातपाताचा संशय व्यक्त करत तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे मांडले. या आरोपांमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.
दरम्यान, आज बारामती येथे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून बारामती विमानतळाची पाहणी करण्यात आली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली. विमानतळ सुरक्षित आहे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अधिकृत अहवालावर अवलंबून असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.
Published on: Feb 11, 2026 04:30 PM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत

