AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: आता बास्स! सलग 4 सामन्यात फ्लॉप, संजूचा फायनलमधून पत्ता कट?

India vs New Zealand 5th T20 Playing 11 : टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून संजू सॅमसन याला वगळणयाची दाट शक्यता आहे.

IND vs NZ: आता बास्स! सलग 4 सामन्यात फ्लॉप, संजूचा फायनलमधून पत्ता कट?
Ishan Kishan and Sanju SamsonImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 31, 2026 | 3:56 AM
Share

टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्याच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 4 सामन्यात फ्लॉप ठरला. संजूला या 4 सामन्यात मोठी खेळता करता आली नाही. टीम मॅनेजमेंटने संजूला अपयशानंतरही संधी देत विश्वास दाखवला.मात्र संजू विश्वात जिंकण्यात अपयशी ठरला. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. संजू सॅमसन याला या पाचव्या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. भारताने सलग आणि पहिले 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. तर न्यूझीलंडने चौथ्या टी 20i सामन्यात पहिलावहिला विजय मिळवला. संजूने या मालिकेतील 4 सामन्यांमध्ये एकूण 40 धावा केल्या. तसेच संजूला या 4 पैकी फक्त 2 सामन्यांतच दुहेरी आकडा गाठता आला. संजूने पहिल्या 4 सामन्यांत अनुक्रमे 10,6,0 आणि 24 अशा धावा केल्या. संजूला चौथ्या सामन्यात विशाखापट्टणममध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र संजूला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे पाचव्या सामन्यातून संजूला डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे.

लोकल बॉय संजू कायम राहणार की आऊट होणार?

तिरुवनंतरपुरम संजूचं होम ग्राउंड आहे. त्यामुळे संजूला आपल्या घरच्या मैदानात आणि वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी आहे. मात्र सलग 4 वेळा संधी दिल्यानंतर निवड समिती संजूवर कितपत विश्वास दाखवणार? हा देखील प्रश्न आहे. संजूला गेल्या 15 डावांत फक्त एकच अर्धशतक झळकावता आलं आहे.

कुणाला संधी-कुणाला डच्चू?

संजूला वगळल्यास त्याच्या जागी इशान किशन याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच रवी बिश्नोई याच्या जागी वरुण चक्रवर्ती याचा समावेश केला जाऊ शकतो. वरुण गेल्या 2 सामन्यांपासून प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, शिवम दुबे, रिंकू सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात येईल.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...