IND vs NZ : पाचव्या-अंतिम सामन्याच्या वेळेत बदल? फायनल टी 20I ला किती वाजता सुरुवात होणार?
India vs New Zealand 5th T20i Match Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांचा हा टी 20i वर्ल्ड कपआधीचा शेवटचा सामना आहे. अशात दोन्ही संघांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

Ravi Bishnoi IND vs NZ T20I SeriesImage Credit source: Bcci
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील 4 सामने खेळवण्यात आले आहेत. या 4 पैकी 3 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 1 सामना जिंकला आहे. भारताने सलग 3 सामने जिंकले. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला विशाखापट्टणममध्ये रोखून विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा कधी आणि कुठे होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
