Ajit Pawar Funeral | अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना; पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर
अजित पवार यांना अखेरची सलामी देताना अप्रत्याशित घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याकडून सलामीदरम्यान मिसफायर झालं. ही घटना बंदूक लोड करताना घडली, सलामीदरम्यान अजित पवारांना मुखाग्नी देताना ही घटना घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अजित पवार यांना अखेरची सलामी देताना अप्रत्याशित घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याकडून सलामीदरम्यान मिसफायर झालं. ही घटना बंदूक लोड करताना घडली, सलामीदरम्यान अजित पवारांना मुखाग्नी देताना ही घटना घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सलामीदरम्यान झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर काल बारामतीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अनेक बडे नेते आणि पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. अजितदादांना निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते.

