MNS Gudipadwa Melava 2026 | ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा पारंपरिक मेळावा उद्या पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर खुर्च्यांची मांडणीही करण्यात आली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा पारंपरिक मेळावा उद्या पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर खुर्च्यांची मांडणीही करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून, त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आणि पक्षाच्या आगामी भूमिका काय असतील, याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने, या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

