Iron Deficiency In Women: महिलामध्ये आयर्नची कमतरता का असते ? त्याची कमतरता कशी पूर्ण करावी ?
लोह म्हणजे आयर्न महिलांसाठी खास गरजेचे पोषक तत्व आहे, याच्या कमतरतेने अनेक गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. सलोनी चड्डा यांनी महिलांमध्ये आयर्नच्या कमतरता का असते ? त्याची कमतरता कशी पूर्ण करावी ? याची माहिती दिली आहे.

लोह म्हणजे आयर्न शरीरासाठी अत्यंत चांगले मिनरल असते.हे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे रक्ताच्याद्वारे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहचवण्यास मदत करते. महिलांसाठी लोह अत्यंत गरजेचे मानले जाते. कारण महिलांना त्यांच्या शरीरात रक्ताची गरज जास्त असते. लोह कमी झाल्यास शरीर कमजोर होऊ लागते. रोजच्या कामासाठी हे गरजेचे असते. त्यामुळे थकवा, कमजोरी आणि एकाग्रता लावण्यात अडचण होते.
प्रदीर्घ काळ आयर्नच्या कमतरतेने एनीमिया ( Anemia ) सारखे गंभीर आजार होऊ शकतो. प्रेग्नंसीत आयर्नच्या कमतरतेने आई आणि मुल दोघांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते. यामुळे महिलांना लोहाचे संतुलन करणे गरजेचे असते. चला तर पाहूयात महिलांना आयर्नच्या कमतरतेने काहीही होऊ शकते आणि याची कमतरता कशी पूर्ण होऊ शकते.
महिलांना लोहाची कमतरता का होते?
महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात. मासिक पाळी हे सर्वात मोठे कारण मानले जाते, कारण या काळात शरीरातून रक्त कमी होते असे आरएमएल हॉस्पिटलमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सलोनी चढ्ढा यांनी म्हटले आहे.
गरोदरपणात आणि स्तनपान करताना लोहाची गरज देखील वाढते. अपुरा आहार, लोहयुक्त पदार्थांचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी हे देखील लोहाच्या कमतरतेस कारणीभूत घटक आहेत. काही महिलांमध्ये, पचनाच्या समस्यांमुळे लोहाचे शोषण कमी होऊ शकते. दीर्घकालीन थकवा, ताण आणि दुर्लक्ष देखील लोहाच्या कमतरतेला कारणीभूत ठरू शकते.
लोहाच्या कमतरतेची लक्षणे कोणती ?
लोहाच्या कमतरतेची अनेक लक्षणे असतात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा. चक्कर येणे, डोकेदुखी, धाप लागणे आणि हृदयाचे ठोके वाढणे.
पिवळी त्वचा, केस गळणे आणि नखे ठिसूळ होणे ही देखील लोहाच्या कमतरतेची लक्षणे आहेत. काही महिलांमध्ये हातपाय थंड किंवा एकाग्रता करण्यात अडचणी येतात. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
कमतरतेवर मात कशी करावी?
लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा
हिरव्या पालेभाज्या खाव्यात
डाळ, हरभरा आणि गूळ खावा
व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खावेत
डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
