Sanjay Raut | हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दिल्ली भेटीवरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमध्ये ज्यांची नावं घेतली जातात, ते नेहमीच येत-जात असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा इतर सहयोगी पक्ष, हे सर्व पक्ष भाजपची अंगवस्त्र आहेत
शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दिल्ली भेटीवरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमध्ये ज्यांची नावं घेतली जातात, ते नेहमीच येत-जात असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा इतर सहयोगी पक्ष, हे सर्व पक्ष भाजपची अंगवस्त्र आहेत आणि अमित शाह यांनी उभे केलेले आहेत. अजित पवारांचा पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केलेला नाही, तसेच एकनाथ शिंदे यांचा गट हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष नाही. हे सर्व पक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले असून नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. याउलट, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “मुळात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांवर नियंत्रण ठेवले आहे. त्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि तपास यंत्रणा तसेच निवडणूक यंत्रणा आहे. या सगळ्यांचा गैरवापर करून आमिषे दाखवली जातात आणि धमक्या दिल्या जातात. मात्र, हे फार काळ चालणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Published on: Mar 18, 2026 11:44 AM
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...

