AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?

Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 19, 2026 | 7:34 PM
Share

गोकुळ निवडणुकीत फेरमतमोजणीमुळे मोठा ट्विस्ट आला. सतेज पाटील पॅनलचे सचिन घोरपडे पराभूत होऊन महायुतीच्या अमर पाटलांनी विजय मिळवला. मात्र, या चुरशीच्या लढतीत सतेज पाटील पॅनलने १३ जागा मिळवत गोकुळ दूध संघावर सत्ता कायम राखली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. फेरमतमोजणीमुळे एका जागेचा निकाल बदलला असून, महायुतीची एक जागा वाढली आहे तर सतेज पाटील पॅनलची एक जागा कमी झाली. फेरमतमोजणीमध्ये महायुतीच्या अमर पाटलांनी विजय मिळवला, तर सतेज पाटील पॅनलचे सचिन घोरपडे पराभूत झाले. या फेरबदलानंतर सतेज पाटील पॅनलला १३ जागा मिळाल्या, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले.

या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत सतेज पाटील यांच्या पॅनलने गोकुळ दूध संघावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, शौमिका महाडिक, मल्लिक आणि के.पी. पाटील यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महायुती पॅनलचा सतेज पाटील यांच्या पॅनलने पराभव केला. विजयानंतर सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. गुलाल उधळून आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. महायुतीच्या पॅनलमधील गोकुळचे तीन माजी संचालक अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

Published on: Oct 19, 2026 07:34 PM

Follow Us