AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : 19 व्या मोसमासाठी 10 संघांचे कर्णधार निश्चित, एकमेव विदेशी कॅप्टन कोण?

IPL 2026 Captain Name List : आयपीएलच्या 19 व्या मोसमाठी सर्व 10 संघ, खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. या निमित्ताने आपण कोणत्या खेळाडूकडे कोणत्या संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे हे जाणून घेऊयात.

IPL 2026 : 19 व्या मोसमासाठी 10 संघांचे कर्णधार निश्चित, एकमेव विदेशी कॅप्टन कोण?
IPL Captain PhotoshootImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 19, 2026 | 7:08 AM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. काही राज्यांमधील निवडणुकांमुळे बीसीसीआयने 19 व्या पर्वातील पहिल्या 16 दिवसांचंच वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 4 डबल हेडरसह 20 सामने होणार आहेत. या 16 दिवसांमध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी 4-4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. सर्व 10 संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. अवघे काही दिवस बाकी असल्याने कोचिंग स्टाफ आणि खेळाडू पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत. या निमित्ताने आपण या 10 संघांचे कर्णधार कोण आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील 10 संघांचे कर्णधारांचं चित्र सुरुवातीलाच स्पष्ट झालं होतं. मात्र सनरायजर्स हैदराबादला ऐन क्षणी बदल करावा लागला. पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून पॅट सुरुवातीच्या सामन्यांत खेळण्यास सक्षम असणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. मात्र गुरुवारी 18 मार्च रोजी पॅटला पहिल्या फेरीतील काही सामन्यांना मुकावं लागणार असल्याचं निश्चित झालं. यासह सनरायर्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी कुणाला द्यायची? हा प्रश्नही निकाली निघाला. पॅटच्या अनुपस्थितीत युवा विस्फोटक फलंदाज ईशान किशन याला सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.

दहाचे दहा फलंदाज भारतीय

पॅटचा गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीसह संघर्ष सुरुय. पॅटला या दुखापतीमुळे एशेज सीरिजमधील काही सामन्यांत खेळता आलं नाही. इतकंच नाही तर पॅटला टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही सहभागी होता आलं नाही. मात्र अनेक दिवस झाल्याने पॅट आयपीएलपर्यंत फिट होईल, असा विश्वास सनरायजर्स हैदराबादला होता. मात्र पॅटला सुरुवातीचे काही दिवसही या 19 व्या हंगामात खेळता येणार नाहीय. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी या मोसमात सर्वचे सर्व कर्णधार हे भारतीयच असणार आहेत. पॅट एकमेव विदेशी कर्णधार आहे. मात्र आता तो जेव्हा कमबॅक करेल तेव्हाच नेतृत्व करु शकेल. त्यामुळे तोवर चाहत्यांना भारतीय खेळांडूच्या नेतृत्वाची ताकद पाहायला मिळणार आहे.

10 संघ आणि 10 कर्णधार

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या.

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड.

कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे.

सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन/पॅट कमिन्स.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रजत पाटीदार.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर.

दिल्ली कॅपिट्ल्स : अक्षर पटेल.

लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?