शुबमन गिल
रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. शुबमनला वयाच्या 25 व्या वर्षी इतकी मोठी जबाबदारी मिळाली. शुबमनचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे झाला. शुबमनने आंतर जिल्हा अंडर 16 सामन्यात मोहालीकडून खेळताना 351 धावा केल्या. त्यानंतर 14 व्या वर्षी शुबमननेने विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये पंजाबकडून 16 वर्षांखालील पदार्पणात द्विशतक झळकावलं. शुबमन अंडर 19 क्रिकेट टीमचा उपकर्णधार होता. शुबमनने 2018 मध्ये 372 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. शुबमन गिलने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर शुबमनला 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. शुबमन तेव्हापासून सातत्याने टीम इंडियासाठी खेळतोय. शुबमनवर आता फलंदाजीसह कर्णधारपदाची दुहेरी जबाबदारी आहे.
Team India : टी 20i वर्ल्ड कप जर्सीचं अनावरण होताच टीम इंडियाची घोषणा, बीसीसीआयकडून कुणाला संधी?
India vs South Africa T20i Series 2025 : बीसीसीआयने रायपूरमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आगामी टी 20i मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. जाणून घ्या कुणाला मिळाली संधी.
- sanjay patil
- Updated on: Dec 3, 2025
- 6:51 pm
IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिलची एन्ट्री! कसं काय ते जाणून घ्या
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे वनडे मालिकेला मुकला आणि कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवलं. आता टी20 मालिकेत खेळणार की नाही याबाबत चर्चा सुरु असताना एक बातमी समोर आली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 3, 2025
- 4:01 pm
IND vs SA : शुबमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार? जाणून घ्या ताजे अपडेट
भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत खेळत नाही. पण आता त्याच्या दुखापतीबाबत नवे अपडेट समोर आले आहेत. 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेत खेळणार की नाही ते जाणून घेऊयात.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 1, 2025
- 9:59 pm
IND vs SA : आम्ही एकमेकांवर.., गुवाहाटीतील पराभवानंतर शुबमन गिल याची प्रतिक्रिया, कर्णधार काय म्हणाला?
Shubman Gill IND vs SA : शुबमन गिल याला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकावं लागलं. शुबमन दुसऱ्या कसोटीचा भाग असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. मात्र तसं काही झालं नाही. भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन गिलने सहकाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी खास मेसेज दिला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 27, 2025
- 9:56 pm
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन बदलला, कुणाला संधी?
India vs South Africa Odi Series 2025 : दक्षिण आफ्रिका टीम इंडिया विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 23, 2025
- 6:21 pm
गुवाहाटी कसोटी ठरणार खास, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 11 वर्षांनंतर असं होणार
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्याचील दुसरा कसोटी सामना हा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खास ठरणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 22, 2025
- 3:00 am
‘आराम करायचा असेल तर शुबमन गिलने आयपीएल सोडावं’, कर्णधारपदही सोडण्याचा दिला सल्ला
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात शुबमन गिलला दुखापत झाली आणि सर्व समीकरणच बदललं. पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता त्याच्या दुखापतीवर सल्ले मिळण्यास सुरुवात झाली आहे. आकाश चोप्राने तर त्याला आयपीएल स्पर्धेत गुजरातचं कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिलाय.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 20, 2025
- 7:50 pm
‘माझ्या कर्णधारपदाला गिलकडून काहीच भीती नाही’, सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
शुबमन गिलकडे कसोटी आणि वनडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. इतकंच काय तर टी20 फॉर्मेटमध्येही त्याच्याकडे उपकर्णधारपद आहे. असं असताना सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेमकं काय म्हणाला ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 20, 2025
- 5:49 pm
IND vs SA : कॅप्टन शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून आऊट; कुणाला मिळणार संधी?
Shubman Gill Update : भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली. त्यानंतर आता टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कर्णधार शुबमन गिल याला दुखापतीमुळे दुसर्या कसोटीत खेळता येणार नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 20, 2025
- 12:43 am
IND vs SA : टीम इंडिया या मैदानात पहिल्यांदाच खेळण्यासाठी सज्ज, मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान
India vs South Africa 1st Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये होणार आहे. भारतासमोर ही मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 19, 2025
- 6:21 pm
दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघ 10 फलंदाजांसह उतरणार? गुवाहाटी कसोटीपूर्वी अशा घडामोडी
कोलकाता कसोटी सामना गमवल्याने भारतीय क्रिकेट संघावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत आहे. हातातला सामना क्षुल्लक चुका करत गमवल्याने आश्चर्य होत आहे. त्यात कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याने दोन्ही डावात 10 फलंदाजांसह उतरावं लागलं होतं. त्याचा फटका पराभवातून मिळाला.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 19, 2025
- 6:19 pm
IND vs SA : शुबमन गिल दुसऱ्या कसोटीत खेळणार की भारताचा कॅप्टन बदलणार? मोठी अपडेट समोर
India vs South Africa 2nd Test : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यात कॅप्टन शुबमन गिल याला मानेला दुखापत झालीय. त्यामुळे शुबमन गुवाहाटीत खेळणार की नाही? याबाबत शंका आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 18, 2025
- 9:16 pm
IND vs SA : शुबमन गिलनंतर या दोन खेळाडूंना रुग्णालयात जाण्याची वेळ, दुसऱ्या कसोटीआधी टेन्शन
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं आहे. कारण आणखी दोन खेळाडूंना रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. नेमकं काय झालं आणि कशासाठी ते जाणून घेऊयात...
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 18, 2025
- 3:59 pm
Shubman Gill : शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर? डॉक्टरांच्या त्या सूचनेमुळे वाढल्या अडचणी
कोलकाता कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलला दुखापत झाली. पहिल्या डावात तो रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या डावातही तो खेळला नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही त्याच्या सहभागाबद्दल प्रशचिन्ह उपस्थित झालं आहे.
- manasi mande
- Updated on: Nov 18, 2025
- 9:03 am
IND vs SA : शुबमन गिलच्या दुखापतीबाबत रुग्णालयातून मोठी अपडेट, दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही?
भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोठा धक्का बसला आहे. भारताने हा सामना तर गमावला, पण कर्णधार शुबमन गिल खेळलाच नाही. यावरून त्याची दुखापत गंभीर असल्याची चर्चा रंगली आहे. आता त्याच्याबाबत एक अपडेट समोर आली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 16, 2025
- 9:12 pm