AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणजी ट्रॉफीत शुबमन गिलच्या मागे लागलं भूत! सामन्यात एकदा नाही तर दोनदा आली प्रचिती

शुबमन गिल सध्या रणजी ट्रॉफीत खेळत आहे. आपल्या फलंदाजीला धार करण्यासाठी शुबमन गिल प्रयत्न करत आहे. पण सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात फेल गेला. यावेळी त्याला दोनदा भूत झपाटलं.

रणजी ट्रॉफीत शुबमन गिलच्या मागे लागलं भूत! सामन्यात एकदा नाही तर दोनदा आली प्रचिती
रणजी ट्रॉफीत शुबमन गिलच्या मागे लागलं भूत! सामन्यात एकदा नाही तर दोनदा आली प्रचितीImage Credit source: PTI
| Updated on: Jan 23, 2026 | 4:33 PM
Share

भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधाराला गेल्या सामन्यांपासून क्रिकेटमध्ये सूर काही सापडत नाही. त्यामुळे फलंदाजीला धार करण्यासाठी देशांतर्गत रणजी ट्रॉफीत घाम गाळत आहे. पण यातही शुबमन गिलच्या हाती काही लागलं नाही. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात तर त्याला खातं खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात फक्त 14 धावांवर खेळ आटोपला. दोन्ही डावात त्याला पार्थ भूतने तंबूचा रस्ता दाखवला. दोन्ही डावात पार्थ भूतने त्याला पायचीत करत बाद केलं. त्यामुळे शुबमन गिलच्या फलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शुबमन गिल फक्त पाटा विकेटवरच धावा करू शकतो असा आरोपही काही जण करत आहेत. गोलंदाजीसाठी पुरक असलेल्या विकेटवर तग धरणं कठीण असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे. त्यामुळे तो टीकेचा धनी ठरला आहे. दुसरीकडे पार्थ भूतची चर्चा रंगली आहे. कोण हा खेळाडू जाणून घ्या.

पार्थ भूतच्या गोलंदाजीपुढे पंजाब नमलं

रणजी ट्रॉफीत पार्थ भूतने पंजाबच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. राजकोटमधील सामन्यात पहिल्या डावात फक्त 33 धावा देऊन 5 विकेट काढल्या. तर दुसऱ्या डावाता 8 धावा देत 5 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. पार्थ भूतच्या गोलंदाजीमुळे सौराष्ट्रचा संघ मजबूत स्थितीत आला. त्याच्या गोलंदाजीमुळे दुसऱ्या दिवशीच पंजाबचा पराभव झाला. सौराष्ट्रने पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात पंजाबने 139 धावांची खेळी केली. सौराष्ट्रीकडे 33 धावांची आघाडी होती. तर दुसऱ्या डावात सौराष्ट्रने 286 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 319 धावांचं आव्हान दिलं. पण पंजाबचा संघ फक्त 125 धावा करू शकला . सौराष्ट्रने हा सामना 194 धावांनी जिंकला.

पार्थ भूत कोण आहे?

पार्थ भूत डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने 2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पार्थ भूतचं क्रिकेटमधील पदार्पण सोपं नव्हतं. कारण तो गुजरातच्या जुनागडमध्ये राहणारा आहे. त्या भागात क्रिकेट अकादमीची सुविधा नव्हती. त्यात घरातून क्रिकेट खेळणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे त्याला बाळकडूही मिळालं नव्हतं. पण पार्थने स्वत:च्या हिमतीवर क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला. तसेच सौराष्ट्र संघात जागा मिळवली. पार्थ भूतने सौराष्ट्रसाठी 21 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले आहे. त्यात 66 विकेट घेतल्या आहेत. सातवेळा पाच विकेट घेण्याची किमया केली आहे. 18 लिस्ट ए सामन्यात 20 विकेट घेतल्यात. फर्स्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि एक अर्धशतकही आहे.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.