Jishnu Dev Verma Oath Ceremony | महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिष्णू देव वर्मा यांना प्रशासन आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे.
जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिष्णू देव वर्मा यांना प्रशासन आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुराचे असून त्यांचा संबंध त्रिपुराच्या राजघराण्याशी असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अधिकृत जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध प्रशासकीय आणि विकासात्मक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 10, 2026 05:52 PM
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; पवारांचा मोठा गौप्यस्फोट
ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच!
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? भाजप प्रवक्ते काय म्हणाले?
भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...

