AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ

Pune | पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ

| Updated on: Mar 10, 2026 | 4:36 PM
Share

सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. पुणे शहरातील अनेक हॉटेल्समध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. पुणे शहरातील अनेक हॉटेल्समध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सिलेंडर संपल्याने हॉटेल मालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चुलीचा वापर सुरू केला आहे. दरम्यान, एलपीजी गॅसचा तुटवडा वाढत असल्याने काळ्या बाजारात सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही ठिकाणी एक सिलेंडर सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिक चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र गॅस पुरवठ्याच्या समस्येमुळे हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Published on: Mar 10, 2026 04:36 PM
Follow Us