AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?

Royal Challengers Bengaluru Women vs Delhi Capitals Women Final Preview : आतापर्यंत वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात मुंबई आणि आरसीबी या 2 संघांनीच ट्रॉफी जिंकली आहे. आता चौथ्या मोसमात नवा चॅम्पियन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?
RCB vs DC WPL 2026 FinalImage Credit source: WPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 05, 2026 | 4:58 AM
Share

दिल्ली कॅपिट्ल्स टीमची यंदाची वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची एकूण आणि सलग चौथी वेळ ठरली आहे. दिल्लीला याआधी तिन्ही वेळा अंतिम फेरीत विजयी होता आलेलं नाही. दिल्लीची गेल्या 3 हंगामांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा यंदाही कायम आहे. त्यामुळे यंदा दिल्लीकडे चौथ्या प्रयत्नात पहिल्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे.  दिल्लीला ही प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे. जेमिमाह रॉड्रिग्स हीने तिच्या नेतृत्वात कॅप्टन म्हणून पहिल्याच प्रयत्नात दिल्लीला अंतिम फेरीत पोहचवलंय. अशात आता जेमिमाहकडे दिल्लीला तिच्या नेतृत्वात पहिल्यांदा ट्रॉफी जिंकून देत प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे. दिल्लीसमोर अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. अशात आता जेमिमाह दिल्लीला विजयी करत अंतिम सामन्यातील इतिहास बदलण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अंतिम सामना कधी?

उभयसंघातील सामन्याला गुरुवारी 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. जेमिमाहकडे दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर स्मृती मंधाना आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. आरसीबीने सलग आणि पहिले 5 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तसेच आरसीबीने पॉइंट्स टेबलमधील पहिलं स्थान कायम राखतं अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर दिल्लीने अटीतटीच्या सामन्यात यूपी वॉरियर्सला पराभूत करुन प्लेऑफचं तिकीट मिळवलं. दिल्लीने त्यानंतर मंगळवारी 3 फेब्रुवारीला एलिमिनेटरमध्ये गुजरातला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली.

दिल्ली याआधी तिन्ही वेळा अंतिम फेरीत विजय मिळवण्यात अपयशी ठरलीय. ट्रॉफीने तिन्ही वेळा दिल्लीला हुलकावणी दिलीय. त्यामुळे दिल्ली यंदा तरी चॅम्पियन बहुमान मिळवण्यात यशस्वी ठरणार का? याकडे दिल्ली चाहत्यांची नजर असणार आहे.

दिल्ली-आरसीबी तिसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान दिल्ली विरुद्ध आरसीबी दोन्ही संघ या चौथ्या मोसमात आतापर्यंत साखळी फेरीत 2 वेळा आमनेसामने आले आहेत. उभयसंघात 17 आणि 24 जानेवारीला सामना झाला होता. आरसीबीने 17 जानेवारीला झालेल्या सामन्यात दिल्लीवर एकतर्फी विजय मिळवला होता. आरसीबीने त्या सामन्यात दिल्लीवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र दिल्लीने दुसऱ्या सामन्यात या पराभवाची परतफेड केली होती. दिल्लीने 24 जानेवारीला आरसीबीला 7 विकेट्सने पराभूत करुन पराभवाची वसूली केली. आता अंतिम सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. आता या सामन्यात कोण मैदान मारणार? हे पाहण्यासाठी सामन्याच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...