AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy: शुबमन गिलच्या नेतृत्वात पंजाबचा पराभव, सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात झालं असं की…

रणजी ट्रॉफी स्पर्धा 2025-26 स्पर्धेत शुबमन गिलच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा डाग लागला. सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली. शुबमन गिलचं नेतृत्व या सामन्यात कामी आलं नाही.

Ranji Trophy: शुबमन गिलच्या नेतृत्वात पंजाबचा पराभव, सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात झालं असं की...
शुबमन गिलच्या नेतृत्वात पंजाबचा पराभव, सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Jan 24, 2026 | 10:54 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलने कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून उतारचढाव पाहायला मिळत आहे. त्याच्या नेतृत्वात विजयापेक्षा पराभव होत असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही 1-2 पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही तशीच स्थिती आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत शुबमन गिलकडे पंजाब संघाची धुरा आहे. पण फलंदाज आणि कर्णधार म्हणून फेल गेल्याचं दिसत आहे. सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात फलंदाजी फेल गेला. तसेच सामनाही गमवावा लागला आहे. सौराष्ट्रने पंजाबला 194 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं आहे. सौराष्ट्रने या सामन्यातील पहिल्या त 172 धावा केल्या होत्या. पण पंजाबला पहिल्या डावात फक्त 139 धावा करता आल्या. त्यामुळे सौराष्ट्रला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसर्‍या डावात सौराष्ट्रने 286 धावा केल्या आणि 320 धावांचं टार्गेट दिलं.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत पंजाबने विजयासाठी मिळालेल्या 321 धावांचं आव्हान गाठताना नांगी टाकली. पंजाबचा संघ दुसऱ्या डावात फक्त 125 धावा करू शकला. हा सामना पंजाबने 194 धावांनी गमावला. कर्णधार शुबमन गिल या सामन्यात अपयशी ठराल. त्याला पहिल्या डावात खातही खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात 32 चेंडूंचा सामना केला आणि 14 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे सौराष्ट्राच्या पार्थ भुतने त्याला दोन्ही डावात बाद केलं. पहिल्या डावात सौराष्ट्राकडून जय गोहिलने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर प्रेरक मंकडने दुसऱ्या डावात 56 आणि रवींद्र जडेजाने 46 धावा केल्या. दुसऱ्या डावात सौराष्ट्राच्या दोन गोलंदाजांनी मिळून पंजाबचे सर्व फलंदाज बाद केले. धर्मेंद्रसिंह जडेजा आणि पार्थ भूत यांनी प्रत्येकी 5 बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), हरनूर सिंग, उदय सहारन, अनमोलप्रीत सिंग, नेहल वढेरा, सनवीर सिंग, हरप्रीत ब्रार, क्रिश भगत, प्रीत दत्ता, जसिंदर सिंग.

सौराष्ट्र (प्लेइंग इलेव्हन): हार्विक देसाई, चिराग जानी, जय गोहिल, अर्पित वसावडा, प्रेरक मांकड, रवींद्र जडेजा, समर गज्जर, हेत्विक कोटक, पार्थ भुत, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.