AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Weather Update | विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल, आता मोठ्या संकटाचा इशारा

Nagpur Weather Update | विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल, आता मोठ्या संकटाचा इशारा

| Updated on: Mar 13, 2026 | 12:13 PM
Share

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान झपाट्याने वाढल्याने उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान झपाट्याने वाढल्याने उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने विदर्भासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. 14 आणि 15 मार्च रोजी विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात ढगाळ वातावरण राहण्याची तसेच जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. मार्च महिन्यातच तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असताना, आता अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी हा अवकाळी पाऊस काही प्रमाणात आराम देणारा ठरू शकतो.

Published on: Mar 13, 2026 12:13 PM
Follow Us