Om Birla | राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं, संसदेत घडलं असं काही की…लोकसभा अध्यक्षांचा थेट इशारा!
लोकसभेतील चर्चेदरम्यान अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला की, नोटीसशिवाय इतर विषयांवर चर्चा करणं अयोग्य आहे. हे वक्तव्य खासकरून त्या चर्चेच्या संदर्भात आलं आहे ज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एपस्टाईन फाइल्स या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी एपस्टाईन फाइल्स प्रकरणाचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केले.
लोकसभेतील चर्चेदरम्यान अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला की, नोटीसशिवाय इतर विषयांवर चर्चा करणं अयोग्य आहे. हे वक्तव्य खासकरून त्या चर्चेच्या संदर्भात आलं आहे ज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एपस्टाईन फाइल्स या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी एपस्टाईन फाइल्स प्रकरणाचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केले. यावर लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी सांगितले की, संसदेतील चर्चा योग्य प्रक्रियेने आणि नोटीस देऊनच व्हावी असे निर्देश दिले आहेत. अनधिकृत मुद्द्यांवर बोलणे संसदीय नियमांचे उल्लंघन ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. या मुद्यावरून सभागृहात थोडी तीव्रता निर्माण झाली होती. काही वेळाने चर्चा पेटली आणि आवाज वाढला, पण स्पीकर यांनी संसदीय शिस्त पाळण्याचे आवाहन केले.
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी

