AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी; बाऊन्सर आणि पोलिस संरक्षणात सिलेंडरचं वितरण

tv9 Marathi Special Report | महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी; बाऊन्सर आणि पोलिस संरक्षणात सिलेंडरचं वितरण

| Updated on: Mar 13, 2026 | 10:49 AM
Share

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या वितरणासाठी काही ठिकाणी बाऊन्सर आणि पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. रिकामे सिलेंडर हातात घेऊन नागरिक गॅस एजन्सी आणि गोडाऊनच्या बाहेर लांबच लांब रांगा लावत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या वितरणासाठी काही ठिकाणी बाऊन्सर आणि पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. रिकामे सिलेंडर हातात घेऊन नागरिक गॅस एजन्सी आणि गोडाऊनच्या बाहेर लांबच लांब रांगा लावत आहेत. ऑनलाईन बुकिंग करताना अडचणी येत असून अनेक ग्राहकांना OTP मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट गॅस एजन्सीसमोर गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे. या वाढत्या गर्दीमुळे आणि संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी एजन्सी चालकांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांच्या उपस्थितीतच सिलेंडरचे वाटप सुरू ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Published on: Mar 13, 2026 10:49 AM
Follow Us