Us – Iran War | इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका, उत्पादन संकटात; कामगारांच्या नोकऱ्याही जाणार
इराण, अमेरिका आणि इस्त्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली MIDC मधील उद्योगांवर गॅस पुरवठ्याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे उद्योग संकटात आले असून, MIDC मधील जवळजवळ 70 टक्के कंपन्या बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इराण, अमेरिका आणि इस्त्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली MIDC मधील उद्योगांवर गॅस पुरवठ्याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे उद्योग संकटात आले असून, MIDC मधील जवळजवळ 70 टक्के कंपन्या बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. MIDC मध्ये सध्या 125 केमिकल आणि 110 टेक्सटाईल कंपन्या आहेत. मात्र गॅस पुरवठा ठप्प असल्यामुळे सध्या केवळ 65 कंपन्या चालू असल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, “कंपनीमध्ये जेवढे साठवलेले स्टॉक आहे, तेच जेवढे पुरेल तोपर्यंतच उद्योग चालू राहतील. पुरवठा थांबला तर उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.” या परिस्थितीमुळे उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, उत्पादन आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रात मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

