Pune Maval Expressway Traffic | 15 तास कार, टॅक्सी, ट्रकमध्येच बसून, प्रात:विधीलाही जाण्याची सोय नाही, पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर काल सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायू वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा अपघात झाला. सायंकाळी सुमारे पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून, टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली. या अपघातामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्गासह जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर काल सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायू वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा अपघात झाला. सायंकाळी सुमारे पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून, टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली. या अपघातामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्गासह जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघाताला आता 15 ते 16 तास उलटले तरी परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. लोणावळ्यापर्यंत सुमारे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवासी काल मध्यरात्रीपासून या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. काही प्रवाशांना रुग्णालयात पोहोचायचे होते, मात्र तेही अजून रस्त्यातच अडकले आहेत. अनेक लोकांच्या महत्त्वाच्या बैठका रद्द झाल्या असून, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक तासांपासून प्रवासी तहानभूक विसरून महामार्गावर थांबले आहेत.
Published on: Feb 04, 2026 12:52 PM
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

