AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : केएल राहुलचं निर्णायक शतक, न्यूझीलंडसमोर 285 धावांचं आव्हान, भारत जिंकणार?

India vs New Zealand 2nd Odi : केएल राहुलचं शतक आणि कर्णधार शुबमन गिल याचं अर्धशतकाच्या मदतीने भारताने राजकोटमध्ये 284 धावा केल्या. भारत या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर न्यूझीलंडसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

IND vs NZ : केएल राहुलचं निर्णायक शतक, न्यूझीलंडसमोर 285 धावांचं आव्हान, भारत जिंकणार?
KL Rahul Century IND vs NZ 2nd Odi RajkotImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 14, 2026 | 6:39 PM
Share

संकटमोचक, कधीही, कुठेही आणि कोणत्याही स्थितीत बॅटिंगसाठी सज्ज असलेला केएल राहुल याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने राजकोटमध्ये न्यूझीलंडसमोर विजयासाठी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 285 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 284 धावा केल्या. भारतासाठी केएलच्या शतकाव्यतिरिक्त कर्णधार शुबमन गिल याने अर्धशतक झळकावलं. तसेच इतर फलंदाजांनी छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण खेळी करत योगदान दिलं. त्यामुळे आता टीम इंडिया सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकणार की न्यूझीलंड विजयाचं खातं उघडणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताला रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र न्यूझीलंडने 70 धावांवर भारताला पहिला झटका दिला. भारताने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहितने 24 धावा केल्या. न्यूझीलंडने त्यानंतर भारताला ठराविक अंतराने झटपट 3 झटके दिले. शुबमन गिल 56, श्रेयस अय्यर 8 आणि विराट कोहली याने 23 धावा केल्या. त्यामुळे भारताची 4 आऊट 118 अशी स्थिती झाली.

केएल-जडेजाची महत्त्वपूर्ण भागीदारी

त्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी भारताच्या डावाला स्थिरता दिली आणि पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. केएल आणि जडेजाने 88 बॉलमध्ये 73 रन्सची पार्टनरशीप केली. जडेजाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र जडेजा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. जडेजाने 44 बॉलमध्ये 1 फोरसह 27 रन्स केल्या.

नितीशची केएलला भक्कम साथ

जडेजानंतर मैदानात आलेल्या ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याने केएलला अप्रतिम साथ दिली. नितीशने केएलसह 57 धावांची भागीदारी केली. नितीश 20 धावा करुन माघारी परतला. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात 29 धावा करणाऱ्या हर्षित राणा याला राजकोटमध्ये काही खास करता आलं नाही. हर्षितने 2 धावा केल्या.

त्यानंतर केएल आणि मोहम्मद सिराज या दोघांनी आठव्या विकेटसाठी 16 बॉलमध्ये 28 रन्स जोडल्या. केएलने या दरम्यान एकदिवसीय कारकीर्दीतील आठवं तर न्यूझीलंड विरुद्धचं दुसरं एकदिवसीय शतक झळकावलं. केएलने 92 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 112 धावा केल्या. तर सिराजने 2 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी क्रिस्टियन क्लार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

न्यूझीलंडसाठी ‘करो या मरो’ सामना

दरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला राजकोटमध्ये विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. अशात आता या सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

Follow Us
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...