Mumbai Mayor Cabin | रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई महापालिकेतील महापौर दालन पूर्णपणे सुसज्ज पद्धतीने तयार करण्यात आले असून, याआधी अनेक दिवस हे दालन बंद होते. गेल्या काही वर्षांत प्रशासकीय राजवट लागू असल्यामुळे कोणालाही या ठिकाणी नियमित संपर्क साधता आला नव्हता. आता निवडणुकीनंतर महापौर पदावर खऱ्या अर्थाने महापौर विराजमान होणार असून, या दालनातूनच मुंबई महापालिकेची सर्व कारभार आणि निर्णय घेतले जातील.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई महापालिकेतील महापौर दालन पूर्णपणे सुसज्ज पद्धतीने तयार करण्यात आले असून, याआधी अनेक दिवस हे दालन बंद होते. गेल्या काही वर्षांत प्रशासकीय राजवट लागू असल्यामुळे कोणालाही या ठिकाणी नियमित संपर्क साधता आला नव्हता. आता निवडणुकीनंतर महापौर पदावर खऱ्या अर्थाने महापौर विराजमान होणार असून, या दालनातूनच मुंबई महापालिकेची सर्व कारभार आणि निर्णय घेतले जातील. गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि अनेक कामे या दालनातून पार पडली होती. मात्र, मुंबई महापालिकेतील सध्याच्या संख्याबळावरून भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यामुळे आगामी महापौर महायुतीतूनच निवडला जाईल, असे अनेक नेत्यांनी ठामपणे वक्तव्य केले आहे.
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका

