Sanjay Raut | त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच; संजय राऊत यांचा राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर निशाना
पक्षफुटीपूर्वी ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल होते, तेच राष्ट्रवादीचे काही नेते आज विलिनीकरणाला विरोध करताना दिसत आहेत. यामागे भाजपचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी दावा केला की, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे “दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत.”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती, तर मित्र पक्ष म्हणून अजित पवार यांनी भाजपला नक्कीच माहिती दिली असती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, पक्षफुटीपूर्वी ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल होते, तेच राष्ट्रवादीचे काही नेते आज विलिनीकरणाला विरोध करताना दिसत आहेत. यामागे भाजपचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी दावा केला की, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे “दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत.” अजित पवार गटातील काही नेत्यांवर गैरव्यवहार, बँका लुटणे तसेच चुकीच्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार केल्याचे खटले सुरू असून, सत्ताधारी पक्षाकडून या नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचवेळी “प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राला जे पटेल तेच करावे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावत सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर निशाणा साधला आहे.
Published on: Feb 04, 2026 01:51 PM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

