Shubman: वनडे मालिका संपली आता शुबमन गिल या स्पर्धेत खेळणार, रवींद्र जडेजाविरुद्ध सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका संपली. आता शुबमन गिलचं पुढे काय? असा प्रश्न आहे. कारण पुढे टी20 सामन्यांचं वेळापत्रक आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आहे. पण टी20 संघात शुबमन गिल नाही. त्यामुळे शुबमन गिल देशांतर्गत स्पर्धेत उतरणार आहे.

भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात आणखी एक वनडे मालिका गमावली आहे. भारत न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका टीम इंडियाने 1-2 ने गमावली. शुबमन गिलच्या नेतृत्वात सलग दुसरी वनडे मालिका गमावली आहे. पुढचं वेळापत्रक पाहता येत्या तीन महिन्यात वनडे आणि कसोटी मालिका होणार नाही. टी20 वर्ल्डकप आणि त्यानंतर आयपीएल स्पर्धा होईल. त्यामुळे तीन महिन्यांचं वेळापत्रक व्यस्त आहे. पण शुबमन गिल टीम इंडियाच्या टी20 मालिकेचा भाग नाही. त्यामुळे त्याच्या वाटेला आराम आला असं अनेकांना वाटलं. पण तसं नाही. शुबमन गिल देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा रणजी ट्रॉफी खेळणार आहेत. दोन्ही खेळाडू आपआपल्या राज्य संघातून मैदानात उतरतील.
रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यात पंजाब आणि सौराष्ट्र हा संघ आमनेसामने असेल. राजकोटमध्ये होणाऱ्या सामन्यात शुबमन गिल पंजाबकडून, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून मैदानात उतरू शकतो. या सामन्याकडे शुबमन गिल विरुद्ध रवींद्र जडेजा म्हणूनही पाहीलं जात आहे. रणजी ट्रॉफी रेड बॉलने खेळली जाणारी स्पर्धा आहे. यात पंजाब आणि सौराष्ट्रची आकडेवारी काही खास नाही. सौराष्ट्र संघ चौथ्या क्रमांकावर, तर पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघ आपआपली स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.
न्यूझीलंडविरुद्ध शुबमन गिल आणि रवींद्र जडेजाची कामगिरी
शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा दोघंही न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळले. शुबमन गिलने तीन सामन्यांच्या तीन डावात 45च्या सरासरीने 135 धावा केल्या. या मालिकेत रवींद्र जडेजाडी कामगिरी हवी तशी झाली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्याला काही खास करता आलं नाही. रवींद्र जडेजाने 2 सामन्यातील तीन डावत फक्त 43 धावा केल्या. तर गोलंदाजीत त्याच्या वाटेला एकही विकेट आली नाही. जितक्या धावा फलंदाजीत केल्या नाही त्याच्या दुप्पट गोलंदाजीत दिल्या.
