AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

Uddhav Thackeray | कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

| Updated on: Mar 06, 2026 | 5:30 PM
Share

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर टीका करत हा अर्थसंकल्प शेतकरी आणि कामगारांसाठी निराशाजनक असल्याचे म्हटले. ठाकरे म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांचे सरकार पाडले गेले, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. ठेकेदारांसाठी मात्र सविस्तर योजना सांगितल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प विकासाचे स्वप्न दाखवणारा आहे, पण प्रत्यक्षात शेतकरी आणि कामगारांना फारसा फायदा होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Published on: Mar 06, 2026 05:30 PM

Follow Us
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार