AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा

tv9 Marathi Special Report | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा

| Updated on: Mar 07, 2026 | 11:01 AM
Share

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या कर्जमाफी योजनेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” असे नाव देण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या कर्जमाफी योजनेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 7 लाख 69 हजार 467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली ‘लाडकी बहीण’ योजना देखील पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठीही अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घोषणांमुळे राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी सरकारने मोठ्या आर्थिक तरतुदी केल्याचे चित्र दिसत आहे.

Published on: Mar 07, 2026 11:01 AM

Follow Us
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…