AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

Manoj jaragne patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी एक सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी शांत रहावं. संसदेकडे जाऊ नये असं ते म्हणाले.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
Delhi
| Updated on: Jul 22, 2026 | 12:59 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीत जंतर-मंतरवर पोहोचले आहेत. ते कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर असून आंदोलनचा प्रमुख चेहरा बनलेले अभिजीत दीपके यांच्याशी चर्चा करत आहेत. शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे आम्ही दाखवून दिलय. आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपाल्या मायबापाने यांना मतदान केलय. आपल्या जिल्ह्याने, तालुक्याने यांना मतदान केलय. या पुढच्या काळात तुम्हाला धक्का जरी लागला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळा देश आणि राज्य तुमच्या पाठिशी आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी जंतर-मंतरवरुन जाहीर केलं. जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

“मतदान भाजपला करायचं. पण पक्ष मोठा मानायचा की लेकराला हे भाजपला मतदान करणाऱ्यांनी ओळखलं पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले. आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी आहे. ते जेव्हा सांगतील, बोलवतील त्यावेळी आम्ही येऊ असा मी शब्द दिला आहे. त्यांनी जर हाक मारली तर मी येणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

क्रूरपणे हल्ला केला असेल तर त्यांच्या मदतीला जायचं नाही का?

“आपण विद्यार्थी म्हणून या आंदोलनाकडे बघूया. गोरगरीबांची लेकरं देशभरात आहेत. दिल्ली आमच्या देशाची राजधानी आहे. देशात न्याय मिळाला नाही तर आपण राजधानीत येतो. सोनमजी, अभिजीत भय्या आंदोलनाला बसलेत. आपल्याला त्यांना साथ दिली पाहिजे. सरकारने क्रूरपणे हल्ला केला असेल तर त्यांच्या मदतीला जायचं नाही का? ज्यांना आपण निवडून दिलय, त्यांना जाणीव करुन द्यायची गरज आहे. इथून पुढच्या काळात हल्ला केला, तर देभरात भाजपच्या मंत्र्याला फिरता येणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

विद्यार्थ्यांनी शांत रहावं, संसदेकडे जाऊ नये

“मी आंदोलनासंदर्भात जाणून घेतलं. विद्यार्थ्यांनी शांत रहावं. संसदेकडे जाऊ नये. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करणार ते. शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे ते आपण महाराष्ट्रात पाहिलय. न्याय मिळतो” असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिला.

शांततेत आंदोलन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही

“शांततेत आंदोलन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. इथून जागा सोडली तर सरकार हल्ला करणार. जंतर-मंतरची जागा आंदोलनासाठी आहे. शांततेत आंदोलन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. शांततेत आंदोलन करण्यासपासून रोखलं तर यांना गावातही येता येणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...