मुदत संपली की थेट… डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आयात शुल्काचा मुद्दा पुढे करत भारतीय औषध उद्योगाला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा परिणाम भारतातून अमेरिकेत औषधांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, 1 ऑगस्ट 2026 पासून अमेरिकेत येणाऱ्या जेनेरिक औषधांवर सुरुवातीची 2 वर्षे आयात टॅरिफ शून्य राहील. त्यानंतर शुल्कात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. तिसऱ्या वर्षी ते 100 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, तर पुढे वाढ होऊन 200 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या मते, या निर्णयामागचा उद्देश औषधांचे उत्पादन पुन्हा अमेरिकेत वाढवणे हा आहे. कंपन्यांनी दिलेल्या मुदतीत अमेरिकेत कारखाने आणि उत्पादन सुविधा उभाराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुदत संपल्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे या निर्णयाचा भारतीय औषध कंपन्यांच्या निर्यातीवर आणि व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Published on: Jul 22, 2026 12:14 PM
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक