AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: बांगलादेशविरुद्धही आता नो हँडशेक पॉलिसी! नाणेफेकीवेळी झालं असं काही…

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वाद गेल्या काही दिवसात विकोपाला गेला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळणार नाही असा पवित्रा बांगलादेशने घेतला आहे. त्याची झळ अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही पोहोचली आहे. नाणेफेकीवेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीवेळी हात मिळवला नाही.

U19 World Cup: बांगलादेशविरुद्धही आता नो हँडशेक पॉलिसी! नाणेफेकीवेळी झालं असं काही...
U19 World Cup: बांगलादेशविरुद्धही आता नो हँडशेक पॉलिसी! नाणेफेकीवेळी झालं असं काही...Image Credit source: Video Grab Twitter
| Updated on: Jan 17, 2026 | 4:24 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला. बांगलादेशने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाणेफेकीवेळी एक वेगळंच दृश्य प्रेक्षकांना पाहता आलं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसवेळी हँडशेक करणं टाळलं. त्यामुळे दोन्ही देशातील वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे. नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा उपकर्णधार जवाद अबरार मैदानात आले होते. पण दोघांनही एकमेकांकडे ढुंकूनही पाहलं नाही. इतकंच तर एकमेकांपासून लांब राहणं पसंत केलं. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाढत्या राजनैतिक आणि क्रिकेट तणावाचे दर्शन घडले. हा क्षण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आणि चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच काय तर बांगलादेशचा उपकर्णधार नियमित कर्णधार अझीमुला हकीऐवजी नाणेफेकीला आला. हकीम प्लेइंग 11 मध्ये असूनही असा निर्णय घेतला गेला.

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जवाद अबरार म्हणाला की, ‘आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. खेळपट्टी ओली दिसत आहे आणि आम्हाला पहिल्या 10-15 षटकांचा फायदा घ्यायचा आहे. आम्ही चांगली तयारी केली आहे, आशिया कपमध्येही आम्ही चांगली कामगिरी केली. आज आमच्याकडे दोन अष्टपैलू खेळाडू खेळत आहेत.’ आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमानला काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा संताप झाला आहे. बांगलादेशने आता भारतात टी20 वर्ल्डकप खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. आयुष म्हात्रे, वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा स्वस्तात बाद झाले. तर वैभव सूर्यवंशी एका बाजूने किल्ला लढवला. त्याने 67 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार मारत 72 धावा केल्या.

पाकिस्तानशी हस्तांदोलन नाही

भारताने आशिया कप 2025 स्पर्धेपासून नो हँडशेक पॉलिसी अवलंबली आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कुरापतींनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडून टाकले आहेत. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारताने नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. आता पाकिस्तानसारखंच बांगलादेशसोबत घडत असल्याचं बोललं जात आहे. बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात संतापाची तीव्र लाट आहे. भारताने वारंवार बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा निषेध केला आहे.

निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी.
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा.
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?.
25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; महायुतीचा ऐतिहासिक विजय
25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; महायुतीचा ऐतिहासिक विजय.