AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट, VSR विमान कंपनीचा मालक..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. त्यामध्येच आज सीआयडी कार्यालयात रोहित सिंह चाैकशीसाठी झाले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट, VSR विमान कंपनीचा मालक..
Ajit Pawar plane crash
| Updated on: Mar 05, 2026 | 12:36 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सकाळी 8.10 ला अजित पवार मुंबई विमानतळाहून VSR कंपनीच्या विमानाने निघाले. त्यानंतर 8.45 ला बारामती विमानतळाच्या शेजारी असलेल्या शेतात त्यांचे विमान कोसळले. या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. धक्कादायक व्हि़डीओही पुढे आले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी चार दिवसात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्याकरिता लोकांनी मोठ्या संख्येने बारामतीकडे धाव घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केली. VSR कंपनीवर थेट आरोप करताना रोहित पवार दिसले. सीआयडीच्या तपासावर रोहित पवार यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये VSR कंपनीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. ज्याबद्दल आता मोठी अपडेट पुढे आली.

VSR कंपनीचा मालक रोहित सिंह हा आज पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल रोहित सिंह याची चाैकशी केली जाणार आहे. रोहित सिंह हा भारत सोडून गेल्याचा दावा केला जात असतानाच आज तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल पुढे आला. मात्र, त्या अहवालाबद्दल अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केली आहेत. अजित पवार यांचा विमान अपघात नक्की कसा आणि कोणत्या कारणाने झाला, याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. आता सीआयडी चाैकशीत नक्की काय पुढे येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अनेक तपास यंत्रणा अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...