AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा धक्कादायक अहवाल! पहिले विमान… नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. आता या डीजीसीएने अहवाल सादर केला आहे. या 22 पानांच्या अहवालात नेमकं काय झालं होतं ते समोर आले आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा धक्कादायक अहवाल! पहिले विमान... नेमकं काय घडलं?
अजित पवारImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 28, 2026 | 6:38 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असतान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ हा अपघात घडला. या घटमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. आता या प्रकरणी DGCAचा 22 पानांचा अहवाल समोर आला आहे. या प्रकरणात अजित दादांच्या विमानचा अपघात कसा झाला हे समोर आले आहे. लँडिंगच्या वेळी विमान हे पहिले एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले असल्याचे समोर आले आहे.

आज 28 फेब्रुवारी रोजी DGCAने त्यांच्या अधिकृत वेब साईटवर महिनाभराच्या तपासानंतर प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात अजित दादांचे विमान हे पहिले झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले आहे. तसेच विमानातील ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला आहे. विमान कोसळलं तेव्हा 2 हजार मीटर दृष्यमानता होती असरे देखील अहवालात म्हटले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

काय नवी माहिती समोर?

प्राथमिक अहवालात पुढे,  अजित पवार यांच्या विमानाच्या दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता. रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं. 8 वाजून 19 मिनिटांनी वैमानिकाचा बारामती ATCसोबत संवाद सुरु झाला होता. विमान कोसळताच महिला वैमानिक ओ शीट, ओ शीट असं ओरडत होत्या. दोन्हा वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटीव्ह होती.

DGCA आणि AAIB कडून तपास सुरू

केंद्र सरकारने अजित पवारांच्या या अपघाताची गंभीर दखल घेतली होती. DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू होती. ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते. कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आज DGCAचा अहवाल आल्यानंतरच अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...