AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला स्टाफसोबत पाकिस्तानी क्रिकेटपटूने..तिचा मदतीसाठी आरडाओरडा, हॉटेल रुममध्ये काय घडलं? WC 2026 मधील धक्कादायक घटना उघड

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी क्रिकेटपटूवर अत्यंत गंभीर आरोप झाला आहे. वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानी टीम ज्या हॉटेलमध्ये थांबलेली तिथे हा प्रकार घडला आहे. पाकिस्तानी टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान सुपर-8 राऊंडमध्ये संपुष्टात आलं.

महिला स्टाफसोबत पाकिस्तानी क्रिकेटपटूने..तिचा मदतीसाठी आरडाओरडा, हॉटेल रुममध्ये काय घडलं? WC 2026 मधील धक्कादायक घटना उघड
Pakistan Team Image Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2026 | 12:46 PM
Share

T20 World Cup 2026 : पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी यंदाचा टी20 वर्ल्ड कप 2026 खूप खराब राहिला. त्यामुळे पाकिस्तानी टीमवर चहूबाजूंनी टीका होतेय. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने खेळाडूंविरुद्ध Action घेतली आहे. या दरम्यान एक वेगळी बातमी समोर आलीय. पाकिस्तान टीमने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले. याचवेळी हॉटेलमध्ये अशी एक घटना घडली, त्यामुळे पाकिस्तानी टीमचा मॅनेजर नवीद चीमाला नाईलाजाने कारवाई करावी लागली.

पाकिस्तानी टीममधील एका खेळाडूवर श्रीलंकेत हॉटेल स्टाफसोबत कथित खराब वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या खेळाडूवर दंडाची कारवाई करण्यात आली. मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना श्रीलंकेच्या कँडी येथील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये घडली. पाकिस्तानी टीमच वर्ल्ड कप दरम्यान तिथे वास्तव्य होतं. टीमच्या एका खेळाडूवर महिला हाऊसकिपिंग स्टाफसोबत खराब व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी टीम मॅनेजर नवीद चीमा यांच्याकडे तक्रार केली. मॅनेजरने खेळाडूला दंड ठोठावला व हॉटेल मॅनेजमेंटची माफी मागितली.

त्यानंतर हॉटेल कर्मचारी तिच्या मदतीसाठी आले

टीम मॅनेजर नवीद चीमाने प्रकरण तिथेच मिटवलं. पण आता या प्लेयरला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीसमोर हजर व्हावं लागेल. तिथे पुढील कारवाई होऊ शकते. टेलीकॉम एशिया स्पोर्टच्या एका रिपोर्टनुसार, या दरम्यान महिला हाऊसकिपिंग स्टाफने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर हॉटेल कर्मचारी तिच्या मदतीसाठी आले. या पाकिस्तानी खेळाडूच नाव अजून समोर आलेलं नाही.

असा वाद पहिल्यांदा झालेला नाही

पाकिस्तानी टीमच्या सुपर-8 राऊंडमधील शेवटच्या सामन्याआधी किंवा त्याच्या आसपास ही घटना घडली होती. पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी हरवलं होतं. या विजयानंतरही आवश्यक रनरेट नसल्याने पाकिस्तानी टीम सेमीफायनल गाठू शकली नाही. हा वर्ल्ड कप पाकिस्तानसाठी खराब ठरला. साखळी फेरीत भारताने त्यांचा दारुण पराभव केला. पाकिस्तान क्रिकेट टीमसोबत असा वाद पहिल्यांदा झालेला नाही. याआधी सुद्धा टीम टूरवर असताना खेळाडूंवर सपोर्ट स्टाफसोबत बेशिस्त वागण्याचे आरोप झाले आहेत.

Follow Us
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?