tv9 Marathi Special Report | परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम; धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी
बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाभाऊ फड यांनी आरोप करताना म्हटले की, परळीतील छोटे व्यावसायिक महादेव मुडेंची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. एसआयटीकडून अलीकडेच काही संशयितांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाभाऊ फड यांनी आरोप करताना म्हटले की, परळीतील छोटे व्यावसायिक महादेव मुडेंची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. एसआयटीकडून अलीकडेच काही संशयितांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. महादेव मुंडे यांची 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळावा यासाठी अनेक वेळा आंदोलनही केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी जुलै 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. एसआयटीने आतापर्यंत सुमारे 150 जणांचे जबाब नोंदवले असून 12 जणांची लाई डिटेक्टर टेस्ट करण्यात आली आहे. तसेच 3 जणांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तपासाचा अहवाल गेल्या आठवड्यात एसआयटीकडे प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर तपासाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. जर हा अहवाल जाहीर केला नाही तर 20 तारखेनंतर परळी बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार

