AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!

सीजेपीचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सीजेपीच्या तसेच आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, याची सविस्तर माहिती दिली. तसेच एक पत्र देऊन केंद्र सरकारकडे मागण्या केरल्या.

जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!
cjp protest and j p naddaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 5:50 PM
Share

Delhi Jantar Mantar Protest : दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात सामील होण्यासाठी देशभरातील तरुण दिल्लीत पोहोचले आहेत. हजारो संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत जमलेले हजारो तरुण संसदेवर जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे सीजेपच्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता सरकारने सीजेपीच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला आहे. सरकारने आंदोलकांना पहिले मोठे आश्वासन दिले आहे.

बैठकीत नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार सीजेपीचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सीजेपीच्या तसेच आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, याची सविस्तर माहिती दिली. सीजेपीतर्फे एक पत्र देऊन केंद्र सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या सीजेपीतर्फे करण्यात आल्या आहेत. याच मागण्यांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कोणावरही गुन्हा दाखल केला जाणार नाही

सीजेपीचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्च केला. ही निषेधार्ह बाब आहे, असेही सीजेपीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. यावर तुमच्या मागण्यांवर सरकार विचार करेल, असे नड्डा यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच आंदोलकांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, असे आश्वासन नड्डा यांनी सीजेपीला दिलेले आहे. त्यामुळे सीजेपीने केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतल्याचे समजले जात आहे.

पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

दरम्यान, दुसरीकडे काहीही झालं तरी आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्हाला शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांची आहे. तर हे आंदोलन संपवण्यासाठी पोलीस आंदोलकांची धरपकड करत आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाचे भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...