AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल! आता या नेत्याकडे प्रभारीपद सोपवले

डॅा. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या जागी प्रसाद यांची निवड सिरीवेल्ला प्रसाद हे आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाचे नेते झारखंडचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल! आता या नेत्याकडे प्रभारीपद सोपवले
congress Dr Sirivella PrasadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 10:39 PM
Share

Maharashtra Congress : महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडत असतं. सध्या इथं महायुती सत्तेत असली तरीही विरोधी बाकावर असणाऱ्या पक्षांनाही तेवढंच महत्त्व आहे. काँग्रेस हा राज्यातला एक महत्त्वाचा विरोधी पक्ष आहे. आगामी निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी केली आहे. तरुणाईला तसेच इतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसतर्फे नुकतेच पुण्यात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता याच काँग्रसेमध्ये थेट दिल्लीवरून आदेश आल्यानंतर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी नव्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नेत्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी

समोर आलेल्या माहितीनुसार  डॅा. सिरिवेल्ला प्रसाद हे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी असतील. रमेश चेन्नीथला यांच्या जागी प्रसाद यांची निवड करण्यात आली. सिरीवेल्ला प्रसाद हे आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांनी झारखंडचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. म्हणजेच त्यांच्याकडे प्रभारी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. आता ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमके काय काय बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

थेट दिल्लीतून आला आदेश

सिरिवेल्ला यांच्याआधी केरळचे रमेश चेन्नीथला यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. ते सध्या केरळचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री झाल्यानंतर गेले चार महिने महाराष्ट्र प्रभारीपद रिक्त होते. शनिवारी एकूण सहा राज्यांच्या प्रभारींची दिल्ली काँग्रेसकडून निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे देण्यात आली.

काँग्रेसची ताकद वाढणार का?

दरम्यान, सध्या काँग्रेस पक्षापुढे अनेक आव्हाने आहेत. राज्यात हर्षवर्धन सपकाळ हे एकटेच पक्षाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यासोबत सर्वांना अपील होईल असा नेता नाही. दुसरीकडे मुंबईचे अध्यक्षपद  खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. त्यामुळे सध्या सिरिवेल्ला यांच्याकडे प्रभारीपद आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काय काय बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?