AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप लिट्टी समोसा विकतो, आईचं मेकअपचं दुकान, टायगरवर हल्ला करणारा ऋतिक प्रेमानंद महाराजाचा भक्त?

टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला ऋतिक कुमार चर्चेत आहे. बिहारमधील बेगूसराय येथील गरीब कुटुंबातून आलेल्या ऋतिकची इन्स्टाग्रामवरील लाइफस्टाइल मात्र श्रीमंतीची आहे. वडील समोसे विकतात तर आई मेकअपचं दुकान चालवते, पण ऋतिक महागड्या गाड्या, जीम आणि स्टाईलिश फोटोंमध्ये दिसतो. तो प्रेमानंद महाराजांचा भक्त असल्याचंही उघड झालंय.

बाप लिट्टी समोसा विकतो, आईचं मेकअपचं दुकान, टायगरवर हल्ला करणारा ऋतिक प्रेमानंद महाराजाचा भक्त?
Tiger ShroffImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 10:18 AM
Share

बिहारच्या बेगूसरायच्या एका गावातून मुंबईत आलेला ऋतिक बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत आहे. त्याला अटक झाल्यानंतर त्याची सोशल मीडिया प्रोफाईल आणि लाइफस्टाइल चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 7 हजार फॉलोअर्स आहेत. तो प्रेमानंद महाराजांना फॉलो करतो. त्याच्या इन्स्टावर त्याचे स्टाइलिश फोटो, रिल्स, जीमचे व्हिडीओ आणि महागड्या कार दिसत आहेत. त्यामुळे त्याच्या लाइफस्टाईलचा अंदाजा येतो.

ऋतिकचे वडील गावात लिट्टी समोसा आणि नाश्त्याचं दुकान चालवतात. तर आई मेकअपचं दुकान चालवते. मात्र, त्याच्या सोशल मीडियावरून त्याची वेगळीच जीवनशैली दिसून येत आहे. त्यामुळे गरीबी असतानाही त्याची लाइफस्टाईल वेगळी कशी? अशी चर्चा रंगली आहे. ऋतिक कुमारच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं नाव ‘ऋतिक लाइफस्टाइल’ असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या अकाउंटवर 7 हजार फॉलोअर्स आहेत. विशेष बाब म्हणजे तो केवळ एकच अकाउंट फॉलो करतो. हे अकाउंट ‘भजन मार्ग ऑफिशियल’ आहे. प्रेमानंद गोविंद शरण जी महाराजचं हे अधिकृत पेज असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून तो प्रेमानंद महाराजांचा भक्त असल्याचं म्हटलं जात आहे.

ऋतिक त्याच्या प्रोफाइलमधील व्हिडिओत आणि फोटोत वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. जीममध्ये व्यायाम करतानाचे त्याचे व्हिडीओ आहेत. त्याच्या शरीरावर टॅटूही दिसत आहेत. महागड्या गाड्यांसोबत त्याने फोटो खेचले आहेत. अशा लाइफस्टाइलमध्ये फोटो काढणं ही त्याची आवड असल्याचं दिसून येत आहे. परिस्थिती चांगली नसतानाही अशी लाइफस्टाइल त्याला कशी जमते? असंही या निमित्ताने म्हटलं जात आहे.

वडील विकतात समोसे

ऋतिकचं कुटुंब बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यााशी संबंधित आहे. त्याचे वडील रामू महतो पिपरा गावात लिट्टी समोसे आणि नाश्त्याचं दुकान चालवतात. त्याची आई संयुक्ता देवी मेकअपचं दुकान चालवते. त्याच्या कुटुंबात त्याला एक लहान भाऊ आणि बहीण आहे. हे कुटुंब मूळचं मटिहानी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बदलपुरा गावचं आहे. त्याच्या वडिलांनी डुमरीतील जमीन खरेदी करून घर बनवलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून हे कुटुंब डुमरीत राहतं. तर नाश्त्याचं दुकान पिपरामध्ये आहे.

दिल्लीतून मुंबईत

ऋतिकने अनेक वर्ष दिल्लीत काम केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईत तो सहा महिन्यापासून राहत होता. मुंबईत कुकिंगशी संबंधित काम आणि रॅपिडोमध्ये तो काम करत होता. श्रावणात काही दिवसांसाठी तो गावाला गेला होता. त्यानंतर परत मुंबईला आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

आईने पाठवले 41 हजार रुपये

ऋतिकची आई संयुक्ता देवी यांच्या मते, त्यांनी मुलाला बाइक खरेदी करण्यासाठी 41 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या आईच्या मते, मुलाला या प्रकरणात फसवण्यात आलं आहे. मित्रांनी लालच दाखवून त्याला या प्रकरणात ओढल्याचा त्याच्या आईचा संशय आहे.

लग्नाची तयारी सुरू असतानाच

मुंबईत काम करत असतानाच एअरपोर्टवर काम करणाऱ्या ज्योती नावाच्या एका मुलीच्या तो प्रेमात पडला होता. दोघेही लग्न करणार होते. 10 ऑक्टोबर रोजी त्याने ज्योतीला घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसवले होते. त्याच दिवशी दुपारी दोघांमध्ये बोलचाल बंद झाली. त्यानंतर कुटुंबाला थेट ऋतिकच्या अटकेचीच माहिती मिळाली. त्यामुळे कुटुंबाला अचानक झटका बसला. एकीकडे मुलाच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच त्याला अटक झाल्याने कुटुंबाला मोठा धसका बसला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?