3 वेळा घटस्फोट… मुलबाळ नाही… 51 वर्षाय राहुल महाजन म्हणाले, माझ्या कुंडलीत…
माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. तीन घटस्फोट आणि मूलबाळ नसण्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला. घाईघाईने घेतलेले लग्नाचे निर्णयच त्यांच्या वैवाहिक अपयशाचे कारण ठरले, असे त्यांनी सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका पॉडकास्टला मुलाखत दिल्यानंतर त्यांच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात 51 वर्षीय राहुल महाजन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. त्यातून त्यांना पश्चात्ताप होत असल्याचं दिसून येतय. पहिल्यांदाच राहुल महाजन यांनी बिनधास्तपणे आणि मनमोकळेपणाने मते मांडली आहेत.
राहुल महाजन हे रियालिटी शो एंटरटेनर आहेत. माजी पायलट आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यांची तीन लग्न मोडली आहेत. राहुल यांनी तीनवेळा संसार थाटला. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. काही ना काही कारणाने नात्यात दुरावा झाला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं. आपले घटस्फोट का झाले याचा पहिल्यांदाच त्यांनी खुलासा केला आहे.
तिसरी व्यक्ती कधीच नव्हती
सुभोजीत घोष यांच्या पॉडकास्टला त्यांनी घटस्फोटाची कारणं सांगितली आहेत. माझ्या तिन्ही वैवाहिक जीवनात कधीच तिसरा व्यक्ती आला नाही. एखादी मुलगीही आली नाही. आपलं कुठं बाहेर लफडंही नव्हतं, असं राहुल महाजन यांनी सांगितलं.
घाईत निर्णय नडला
माझे तीन लग्न झाले. पण तिन्ही लग्न दोन तीन महिन्याच्या निर्णयाने झाली आहेत. अत्यंत घाईत लग्न केलं हीच मोठी चूक होती. मी प्रत्येक लग्नापूर्वी किमान सहा महिन्याचा अवधी घेतला असता, सारासार विचार केला असता, मॅच्युरिटीने निर्णय घेतला असता किंवा लग्नाच्या निर्णयाला थोडं पुढे ढकललं असतं तर कदाचित आज माझी पार्टनर कोणी वेगळीच असती, असं त्यांनी म्हटलंय.
उत्साहाच्या भरात लग्न हा दोष
माझा स्वयंवर शो दोन ते तीन महिन्याचा होता. त्यामुळे घाईत निर्णय घेतला. अशा गोष्टीतून आपण शिकतो. माझी कुंडली खराब होती असं नाहीये. मी अति उत्साहाच्या भरात लग्न केलं हा दोष होता. तिन्हीवेळा जेव्हाही लग्न केलं, ते अत्यंत घाईत केलं. कधी सहा महिने किंवा एक वर्षाचा गॅप घेतला नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
