भारतीय खेळाडूने थेट घालवली इज्जत, हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यासोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला पोलिसांनी..
जपानमध्ये आशियाई पॅरा गेम्स सुरू आहेत. भारतीय खेळाडूही जपानमध्ये या स्पर्धेसाठी दाखल झाले. मात्र, यादरम्यानच एक धक्कादायक घटना घडली, त्याने पूर्ण चव घालून टाकली. या घटनेने भारतीय खेळाडूंची मोठी बदमानी झालीये.

जपानमध्ये सध्या आशियाई पॅरा गेम्स सुरू आहेत. भारतीय खेळाडूही जपानमध्ये या स्पर्धेसाठी दाखल झाले. दमदार कामगिरी केली जात आहे. या स्पर्धेकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, भारतीय खेळाडू आपल्या खेळामुळे नाही तर एका वाईट गोष्टीमध्ये जपानमध्ये चर्चेत आहेत. एका खेळाडूचे चुकीचे पाऊल ज्याने सर्वांनाच रोषाचा सामना करावा लागला. भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याने थेट लैंगिक छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या प्रकारानंतर खेळावर लक्ष केंद्रीय करण्याऐवजी सर्व प्रकरण मिटवण्यात भारतीय अधिकाऱ्यांचा वेळ गेला. या प्रकरणात भारतीय खेळाडू मोहम्मद शम्स आलम शेख याला जपानी पोलिसांनी ताब्यातही घेतले. भारतीय पॅरालिम्पिक समिती त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे पूर्ण भारतीय खेळाडूंची बदनामी होत आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, नागोया फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेलमध्ये घडली. भारतीय पॅरा जलतरण संघाच्या खेळाडूंना या हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. यावेळी हाऊसकीपिंगचे काम करण्यासाठी एक महिला कर्मचारी भारतीय खेळाडूच्या रूमध्येही गेली. तिथे भारतीय खेळाडूने तिच्यासोबत गैरवर्तन केले. हॉटेलच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, संबंधित खेळाडूने महिला कर्मचाऱ्याला चुकीचा स्पर्श केला.
अश्लील हावभाव केले. इतक्यावरच न थांबता थेट त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारानंतर महिला कर्मचाऱ्याने थेट पळ काढला आणि घडलेला प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी त्याला अटक करत थेट कोर्टात त्याच्या विरोधात खटला चालण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. स्थानिक आयोजन समितीने तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप केला.
भारतीय पथकाला संबंधित महिलेची लेखी मागण्यास सांगून तात्काळ या खेळाडूला भारतात पाठवण्यास सांगितले. त्यानंतर रात्री भारतीय खेळाडूला इतर हॉटेलमध्ये हलवण्यात आले आणि सकाळी त्याला भारतात पाठवण्यात आले. मात्र, खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष देण्याऐवजी भारतीय अधिकाऱ्यांचा वेळ पोलिस आणि हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यातच गेला. आता त्याच्यावर भारताकडूनही मोठी कारवाई केली जाणार आहे.
