AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री दिसताच महिला आपल्या नवऱ्याला लपवायच्या, मोना डार्लिंग म्हणून होती प्रसिद्ध, तुम्ही ओळखलं का?

ही अभिनेत्री समोर येताच अनेक महिला त्यांच्या नवऱ्यांना लपवून ठेवायच्या. मोना डार्लिंग म्हणून अभिनेत्रीला मिळालेली प्रसिद्धी. वयाच्या 15 व्या वर्षीच पडली होती प्रेमात.

ही अभिनेत्री दिसताच महिला आपल्या नवऱ्याला लपवायच्या, मोना डार्लिंग म्हणून होती प्रसिद्ध, तुम्ही ओळखलं का?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 17, 2026 | 1:33 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीत 1970 च्या दशकात शर्मिला टागोर, आशा पारेख, जया भादुरी आणि हेमा मालिनी यांसारख्या अभिनेत्रींचा दबदबा होता. मात्र, आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री बिंदू यांचेही या काळात विशेष स्थान होते. खलनायिकेच्या भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या बिंदू यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली.

बिंदू यांचे वडील नानूभाई देसाई हे चित्रपट निर्माते तर आई ज्योत्सना या रंगमंचावरील कलाकार होत्या. त्या सात बहिणी आणि एका भावामध्ये सर्वांत मोठ्या होत्या. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

‘जंजीर’मधील मोना डार्लिंगने दिली नवी ओळख

बिंदू यांनी 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनपढ़’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘दो रास्ते’, ‘इत्तेफाक’ आणि ‘कटी पतंग’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली छाप पाडली. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातील ‘मोना डार्लिंग’ या भूमिकेमुळे त्या विशेष लोकप्रिय झाल्या.

ग्लॅमरस आणि नकारात्मक भूमिका साकारण्यात बिंदू या प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांच्या अभिनयाचा प्रभाव इतका होता की प्रेक्षक त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या पडद्यावरील खलनायिकेच्या भूमिकेत पाहत असत. काही महिलांना तर आपल्या पतींनी बिंदू यांच्याकडे आकर्षित होऊ नये, असे वाटत असल्याचेही सांगितले जाते.

वयाच्या 15 व्या वर्षी जडले प्रेम

बिंदू यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा झाली. वयाच्या सुमारे 15 व्या वर्षी त्यांचे शेजारी आणि व्यावसायिक चंपकलाल झवेरी यांच्याशी प्रेमसंबंध जुळले. सुरुवातीला कुटुंबाचा विरोध असतानाही त्यांनी विवाह केला. त्यांच्या पतीने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला पाठिंबा दिला.

पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणाऱ्या बिंदू यांनी आपल्या अभिनयाला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी खलनायिकेच्या भूमिकांनाही लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. ‘शिव्या हाच माझा पुरस्कार होता,’ या आशयाच्या त्यांच्या विधानातून त्यांच्या अभिनयाचा प्रेक्षकांवर झालेला प्रभाव स्पष्ट होतो.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल