AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी काही लिहिण्याच्या स्थितीमध्ये नाही; अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये प्रकृतीबाबत चिंता

Amitabh Bachchan Health: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांच्या ब्लॉगमध्ये जे काही लिहिले ते पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अमिताभ यांची प्रकृती तर ठिक आहे ना? असा सवाल चाहत्यांनी विचारला आहे.

मी काही लिहिण्याच्या स्थितीमध्ये नाही; अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये प्रकृतीबाबत चिंता
Amitabh BachchanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 10:08 AM
Share

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे आणि आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतात. वयाच्या 84व्या वर्षी देखील ते तितक्यात उत्साहाने अनेक गोष्टी करताना दिसतात. पण आता चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टने खळबळ उडाली आहे. अमिताभ बच्चन यांनी थेट ‘मी काही लिहिण्याच्या परिस्थितीमध्ये नाही’ असे म्हटले आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी बुधवारी आपल्या चाहत्यांना चिंतेत टाकले. खरे तर, त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर खुलासा केला की त्यांना थोडा ब्रेक घेऊन आपल्या रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, या मागचे कारण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये अभिनेत्याच्या तब्येतीबाबत चिंता निर्माण झाली आहे. कारण बिग बी हे अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहेत, जे आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नियमित अपडेट शेअर करत असतात.

वाचा: आनंदाची बातमी! प्राजक्ता माळी आणि आदिनाथ कोठारे आले एकत्र, सिनेमाची आतुरता

अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली

एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर बिग बी यांनी लिहिले की, “माफ करा. मी क्षमाप्रार्थी आहे. मला विश्रांती घेऊन बरे होण्यासाठी काही दिवसांची सुट्टी घेण्याचा सल्ला दिला गेला आहे, त्यामुळे सध्या मी काहीही लिहू शकण्याच्या स्थितीत नाही.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे.

यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, “सर्वांना प्रथम दसराच्या शुभेच्छा… खूप प्रेम, आनंद, समाधान आणि प्रार्थना. मला सध्या खूप कठोर विश्रांती घेऊन बरे होण्याचा सल्ला दिला गेला आहे. त्यामुळे मला संभाषण करण्याची परवानगी नाही. कृपया वाईट वाटून घेऊ नका. मी माफी मागतो. पण हेच माझे आदरपूर्ण उत्तर समजा. आशा आहे की नंतर आणखी बोलता येईल.”

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध नाव आहे. ते ८४ वर्षांचे आहेत आणि तरीही काम करत आहेत. ते ‘कौन बनेगा करोड़पती’चे होस्टिंग करत आहेत आणि इतर चित्रपटांची शूटिंगही पूर्ण करत आहेत. गेल्या काही दिवसांत अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये आपल्या गुडघ्याच्या दुखापतीचा खुलासा केला होता, जी त्यांना शूटिंगदरम्यान झाली होती.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?