AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“साहेब तर घाबरले…” तिरंगा वाद पेटला, प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान याच्या फोटो प्रदर्शनावरून मोठा गदारोळ, 70 हून अधिक छायाचित्र हटवली

Rehan Vadra art and photography exhibition Controversy : दिल्लीत आता अजून एक वाद पेटला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्या मुलाने भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनावरून हा गदारोळ उठला आहे. काँग्रेसने त्यावरून केंद्र सरकारवर निशाणा धरला आहे.

साहेब तर घाबरले... तिरंगा वाद पेटला, प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान याच्या फोटो प्रदर्शनावरून मोठा गदारोळ, 70 हून अधिक छायाचित्र हटवली
प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान याच्या फोटो प्रदर्शनावरून मोठा गदारोळ, 70 हून अधिक छायाचित्र हटवली
| Updated on: Oct 22, 2026 | 10:06 AM
Share

Rehan Vadra art and photography exhibition Controversy : दिल्लीतील बिकानेर हाऊसने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान याच्या अलीकडील दिल्लीतील आंदोलनांशी संबंधित अनेक छायाचित्रे प्रदर्शनातून काढून टाकली. प्रदर्शन सुरू होण्याच्या काही तास आधी हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी बिकानेर हाऊसकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही. त्यावरून आता मोठा गदारोळ उडाला आहे. प्रदर्शनातून 70 हून अधिक छायाचित्र हटवल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काँग्रेसने यावरून सरकारवर थेट हल्लाबोल चढवला आहे.

‘नो आयडिया इज फायनल’

रेहानच्या एकल छायाचित्र प्रदर्शनाच नाव ‘नो आयडिया इज फायनल’ आहे. या प्रदर्शनात सुरुवातीला 100 हून अधिक छायाचित्रे होती, मात्र आता सुमारे 40 छायाचित्रे शिल्लक आहेत. ‘राजकीय वातावरणाचा हवाला देऊन छायाचित्रे हटवण्यात आली आहेत, मात्र तो तिरंग्याची छायाचित्रे हटवणार नाही’ अस रेहान याने स्पष्ट केले आहे. आता यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

तिरंगा छायाचित्र हटवणार नाही

दरम्यान हे प्रदर्शन सुरू होण्यापूर्वीच बिकानेर हाऊस व्यवस्थापनाने येथील बहुतांश छायाचित्रं ही आक्षेपार्ह असल्याचा दावा करत हटवली. त्यात तिरंगा असलेल्या दोन छायाचित्राचाही समावेश होता. ही दोन्ही फोटो हटवण्याचे सक्त निर्देश दिल्याचा दावा करण्यात येत आहे. तर भारतीय राष्ट्रध्वजाचे छायाचित्र हटवण्यास रेहान यांनी स्पष्ट नकार दिला. ही छायाचित्रं केवळ आंदोलनांचे दृश्य दस्तऐवजीकरण व्हिज्यु्अल डॉक्युमेंटेशन आहे, त्यावरून इतका गदारोळ करण्याची आणि आक्षेप घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती असा पलटवार रेहान वाड्रा यांनी केला आहे.

साहेब तर घाबरलेत

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसमधून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रियंका गांधी यांनी ही सेन्सॉरशिप असल्याचा दावा केला आहे. हा देशातील तरुणांचा आवाज दाबण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात लोकशाही उरलेली नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला. तर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा, खासदार कार्ती चिदंबरम, युवा काँग्रेसच्या लिगल सेलने तीव्र निषेध व्यक्त करत, साहेब तर घाबरलेत असा टोला लगावला आहे. कितीही सेन्सॉरशिप लादली तर सत्य लपत नाही अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून देण्यात आली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?